Amit
Amazon.in17 Sept 2021
खूपच सुंदर, जरूर वाचावे असे पुस्तक खूपच सुंदर, जरूर वाचावे असे पुस्तक
मुंबई पोलीस व राकेश मारिया सर यांच्या बद्दल खूप छान व सर्वसाधारण लोकांना सहसा माहीत नसलेली अशी माहिती व कार्य पद्धती आणि त्यातील अडचणी याबद्दल अतिशय सखोल माहिती या पुस्तकात दिली आहे. मारिया सरांच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटनाक्रम एकूण 35 भागांमध्ये सविस्तर मांडले आहेत. मूळ पुस्तकाची छापील किंमत ही 799 रुपये आहे पण सवलतीच्या दरात हे पुस्तक केवळ 299 रुपयांना केवळ 24 तासांच्या आत घरपोच मिळाले. पुस्तकाची पाने अथवा अक्षरांचा आकार किंवा छपाई यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. अतिशय चांगल्या प्रतीचे आणि अर्थातच उत्तम माहिती असलेले प्रसिद्ध व्यक्तीचे हे आत्मचरित्र आहे. या विषयात रस असलेल्या प्रत्येकाने जरुर वाचावे. Read more Read less













